भोर तालुक्यातील २२ रस्त्यांच्या विकासासाठी ३ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर; पालकमंत्री व आमदारांच्या पाठपुराव्याला यश

 

                           पुरंदर रिपोर्टर live 

भोर : प्रतिनिधी 

              भोर तालुक्यातील विविध भागातील रस्त्यांच्या सुधारणा आणि विकासासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत जनसुविधा योजनेअंतर्गत एकूण ३ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून २२ ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांसाठी प्रत्येकी १५ लाख १० हजार रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिली.


पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांना यश

शिवतरे यांनी सांगितले की, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या आदेशानुसार, तसेच आमदार शंकर मांडेकर यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.

विकासकामांची यादी पुढीलप्रमाणेः

१) बाजारवाडी गावठाण व वाड्यांतील अंतर्गत रस्ते २) गोकवडी

३) शिरवली (तर्फे भोर) ४) रावडी

५) वडगाव डाळ

६) बालवडी

७) कारी कोर्ले

८) कर्नावड - विठ्ठल रखुमाई मंदिर - मळाई मंदिर रस्ता

९) अंगसुळे

१०) साळव

११) वडतुंबी

१२) नाझरे

१३) शिंद

१४) किवत

१५) केंजळ

१६) किकवी - अनंत डेअरी रस्ता १७) टापरेवाडी

१८) महुडे खुर्द - ब्राम्हणघर

१९) शिरवली हिमा - कुडली खुर्द - कुडली ब्रु

२०) गुढ – निवंगण

२१) नांदगाव


                 “तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी मिळणे ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. लवकरच या सर्व रस्त्यांच्या कामांना गती मिळेल आणि ग्रामीण भागात चांगली सुविधा उपलब्ध होईल,” असे शिवतरे यांनी सांगितले.या निर्णयामुळे भोर तालुक्यातील ग्रामस्थांना दळणवळणाच्या अधिक सुलभ सुविधा उपलब्ध होणार असून, ग्रामीण विकासासाठी मोठी चालना मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments